काळे झेंडे दाखविणाऱ्याना आम्ही घाबरत नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (पहा व्हिडीओ )

0

जळगाव ;- शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज २ वाजेच्या सुमारास आगमन झाले यावेळी उमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि पदाधिकारी यांनी झेंडे दाखविणार असल्याबाबत बोलताना म्हणाले कि काळे झेंडे दाखविणाऱ्याना आम्ही घाबरत नसल्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,आ. राजुमामा भोळे आदी उपस्थित होते .

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम सध्या हाती घेण्यात आला आहे. त्यातील जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान शासन आपल्या दारी या कर्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी विमानतळावर आगमन झाले . यावेळी त्यांच्यासमवेत ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.