आयसीसीकडून विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

वनडे विश्वचषकाची (ODI World Cup) तयारी सुरु झाली आहे. आज आयसीसीने (ICC) भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑक्टोबर पासून विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी भारतात पहिला सामना होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर १५ नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. एकूण १० मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मैदानावर देखील सामने खेळले जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) आणि पुण्यातील गुहंजे येथील स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने खेळले जाणार आहे.

मुंबई आणि पुण्यातील मैदानावर दहा सामने होणार आहेत. यामध्ये 9 सामने साखळी फेरीतील आहेत तर एक सामना उपांत्य फेरीचा आहे. महाराष्ट्रात भारताचे दोन साखळी सामने होणार आहेत. पुणे येथे 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरोधात तर मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर Qualifier 2 सोबत टीम इंडियाचा सामना होणार आहे. भारत जर उपांत्य फेरीत (Semi-Finals)  गेला तर मुंबईत सामना होण्याची शक्यता आहे.

या 12 मैदानावर रंगणार विश्वचषकाचा सामना

भारतामधील 12 मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर खेळवण्यात येणार आहे. सेमीफायनलचे सामने कोलकाता आणि मुंबईच्या मैदानावर होणार आहेत. अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे सराव सामने खेळवले जाणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.