प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ..! जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

 

जळगाव ;- जिल्ह्यात विविध ठिकाणी ७५ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

धरणगाव येथे आदिवासी महिलेच्याहस्ते ध्वजारोहण

शिवसेना कार्यालय येथे प्रथमच पहिल्या ध्वजारोहण फडकवण्याचा मान आदिवासी महिला द्रौपदी हिरामण भिल यांचा हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आला

यावेळी त्याच्या सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सौ रेखाताई चौधरी यांच्या हस्ते द्रौपदी हिरामण भिल यांचा साडी चोळी देऊन माजी नगराध्यक्ष उषा वाघ यांचा हस्ते पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ , उषाताई गुलाबराव वाघ युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद माळी ,उपजिल्हासंघटक राजेंद्र ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी, जेष्ठ शिवसैनिक पांडुरंग महाजन, राजेंद्र ल बोरसे छोटु चौधरी ,शेरू खान, किशोर आफ्रे, लखन पटोणे, फिरोज खान, रवींद्र सोनार ,दिलीप महाजन, कृपाराम महाजन, सुनील चव्हाण ,जीतूभाऊ धनगर, भीमराव धनगर , राहुल रोकडे, रवींद्र जाधव ,परमेश्वर महाजन ,दिनेश येवले,किशोर महाजन, गोपाल महाजन ,चेतन जाधव ,यशवंत वऱ्हाडे, किरण मराठे ,रणजित पुरभे ,बापू महाजन, शरद पाटील ,विनोद रोकडे, पप्पू सोनार, किरण अग्निहोत्री उपस्थित होते.

पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे विविध उपक्रम
पाळधी ता, धरणगाव – पाळधी येथे भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने ध्वजारोहणाकरिता गावातील विविध ठिकाणी विद्यार्थी हे प्रभात फेरी च्या माध्यमातून जात असतात या प्रभात फेरीमध्ये सहभागी असलेल्या व शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.

 

निराधार भटक्या गरजूंना कपडे व ब्लॅंकेट वाटप केले, गावाच्या दोन्ही बाजूच्या मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रकारच्या कौतुकास्पद उपक्रम राबवत जीपीएस मित्र परिवाराने गणराज्य दिन साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, यासह जीपीएस मित्र परिवाराचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव (हरे) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपळगाव हरेश्वर ;- माजी विद्यार्थी संघ संचलित मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव (हरे) विद्यालयात येथे आज दि.26 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी 75 वा प्रजासत्ताक दिना साजरा करण्यात आला.

रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. पंकज शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. मुकेश तेली संस्थेचे कार्याध्यक्ष तथा ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील ,संस्थेचे सहसचिव संजय पाटील , संचालक एस. एस. पाटील, दिलीप विजयसिंह देशमुख , शिवानंद तुकाराम पाटील, माजी सैनिक भगवान पाटील, गोविंद मंदिर संस्थांचे अध्यक्ष शामराव महाजन , पत्रकार – राजू ठाकूर,ईश्वर पाटील, रमेश चौधरी, विठ्ठल गीते, विठ्ठल गीते, दौलत गीते , वसंत माळी, रवी गीते, देविदास पाटील, रमेश उबाळे,विनोद महाजन,कोकिळा पाटील, नंदा पाटील, वंदना पाटील, स्वाती पाटील, सुनिता घोंगडे, प्रमिला गायकवाड, कमलबाई पाटील, कल्पना गीते, प्रतिभा गीते, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विश्वनाथ चौधरी, सुरेंद्र देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ उपस्थीत होते.

कवायतीचे सूत्रसंचालन अधीक्षक नितीन पाटील यांनी केले. नारायण भावजी महाजन व विठ्ठल रामदास गीते यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. सूत्रसंचालन गोविंद महाजन यांनी केले.

चिनावल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
चिनावल ता रावेर ;- चिनावल ता रावेर येथे 26 जानेवारी हा 75 प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
गाव दरवाजा येथे भारत माता पूजन करण्यात आले. या नतंर नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नूतन प्राथमिक विद्यामंदिर, जि प मुलांची व मुलीचा तसेच खिजर एज्युकेशनल उर्दू हायस्कूल, उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून भारत माता व देशभक्ती पर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.

प्रभातफेरी ग्रामपंचायत जवळ आल्यावर सरपंच ज्योती भालेराव यांनी भारत माता पूजन केले . चेअरमन विनायक महाजन यांचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच उर्दू हायस्कूल, जि प मराठी मुलांची, मुलींची तसेच उर्दू शाळेतही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थांननी विविध कलागुण, रांगोळी स्पर्धा व देशभक्ती पर गीत सादर केले या सर्व कार्यक्रम ना गावातील सर्व स्तरीय संस्था चे पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण, मोठ्या संख्येने उपस्थित होते .

ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच योती भालेराव, उपसरपंच शाहिन बी शे जाबीर व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी कैलास भगत तसेच नूतन माध्यमिक विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र फालक, सेक्रेटरी गोपाळ पाटील व सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापक एच आर ठाकरे, खिजर एज्युकेशनल उर्दू हायस्कूल मध्ये संस्थेचे उपाध्यक्ष अस्लम खान हाजी शब्बीर खान यांनी ध्वजारोहण केले. या वेळी चेअरमन हसन शे हुसेन , व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक शे निसार तसेच सर्व शाळाचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी एन एन महाजन व एम एस महाजन यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

जि. प. मराठी शाळा मोरगाव बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

मोरगाव तालुका रावेर;- मोरगाव बुद्रुक येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सरपंच स्वप्निल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पो. पा. विनोद पाटील, ग्रां. प. सदस्य किरण ढिवरे,, सौ. शोभा पाटील,,अं.से. कल्पना पाटील, ग्रामस्थ प्रदीप संधानशीव,अशोक कोळी, पद्माकर पाटील व असंख्य गावकरी उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण ढिवरे यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रजासत्ताक दिन व संविधान यांचे महत्त्व पटवून दिले. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रदीप संधानशीव यांनी विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप केले.

सांगवे /विटवे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
ऐनपुर ता रावेर: येथून जवळ असलेल्या सांगवे/विटवे येथे ७५वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
सर्व प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवे /विटवे येथील विद्यार्थ्यांनी गावात,रभात फेरी काढ़त ग्रा. पं. कार्यालय विटवे येथे ज्येष्ठ नागरिक गंभीर शेनू चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . तसेच शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यातआले.

ग्रा. पं. तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच सांगवे /विटवे गृप ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े यानी प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी, ग्रामसेवक जगदीश बावीस्कर, मुख्याध्यापक, शिक्षक,आंगनवाड़ी सेविका, आशा सेविका,कृषी सहाय्यक शेखर वाघ, आरोग्य अधिकारी , सांगवे पोलिस पाटील, माजी उपसरपंच, सुरेश कोळी,दादाराव कोळी, (महाराज) उपसरपंच ईश्वर चौधरी, ग्रा. पं. सदस्य मधुकर पाटील, गणेश मनुरे, कैलास मनुरे, गजानन कोळी, वैभव चौधरी,पोलिस पाटील बाळु पवार, विमल भिल्ल, सुरेश तायड़े, शिवाजी कोळी,पंकज कोळी, श्रीराम कोळी , नरेंद्र वानखेड़े , सलीम शेख, रतन भिल्ल,व गावातील महिला तरुण, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रजासत्ताक दिनानिमित्त चांगदेव गावाचा नकाशा रेखाटुन गावकऱ्याचे वेधले लक्ष
चांगदेव , ता. मुक्ताईनगर ;- ७५वा प्रजासत्ताक दिन , चांगदेव येथे उत्साहात पार पडला. प्रथम सोनजी भावडु चौधरी महाविद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात येऊन प्रभात फेरी काढण्यात आली.

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय येथून आलेल्या कृषीदुत पवन पाटील,प्रशांत पाटील,मयुर शिरसाठ,रोहन ठाकरे,विष्णुवर्धन रेड्डी, मिरियाळकर थरून यांनी बाजूला रेखटलेल्या चांगदेव गावाच्या नकाशाची सर्व ग्रामस्थांनी पाहुन कौतुक केलं. त्यानंतर देशभक्तीपर गीत हे विद्यार्थिनींन कडून सादर करण्यात आले.

जी एस हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा

अमळनेर ;- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी व ज्येष्ठ कलाशिक्षक डी एम दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी संस्थेचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस. पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस. पाटील,पर्यवेक्षक ए.डी.भदाणे, एस. आर.शिंगाणे,शिक्षकेतर प्रतिनिधी शाम पवार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

निंभोरा बु|| येथे ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा
कृषी तंत्र विद्यालय निंभोरा बु|| येथे ७५ वा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रल्हाद बोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कृषि तंत्र विद्यालयाच्या शिक्षिका कु. आम्रपाली जाधव तसेच विद्यार्थिनी निशा इंगळे, भावना भालेराव व आरती कोळी यांच्या सहकार्याने रंगोळ्या काढून परिसरात सुशोभीकरण करण्यात आले होते. आकर्षण म्हणून भारत मातेची प्रतिमा रांगोळीने साकारण्यात आली होती.

 

या कार्यक्रमास .गुणवंत भंगाळे,रवींद्र भोगे, सुधीर मोरे ,रवींद्र नेहते, दत्तात्रय पवार,वाल्मीक पवार ,अनिल ब-हाटे, एम. टी. बोंडे, अनिल दोडके व रोशन बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कृषी तंत्रविद्यालयाचे प्राचार्य श्री मोहन भंगाळे, शिक्षक संदीप महाजन,विवेक बोंडे, जितेंद्र भावसार व नराज बावस्कर तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्याच बरोबर निंभोरा पोलीस स्टेशन येथे प्रजासत्ताक दिना निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये द्वितीय वर्षाचा विद्यार्थी नामे दिपक तायडे याने रक्तदान केले त्या वेळी सोबत कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद भाऊ बोंडे, उपाध्यक्ष डॉ.एस.डी.चौधरी व निंभोरा पोलीस स्टेशनचे ए. पी,आय. श्री बोचरे उपस्थित होते.

गिरडगाव जि.प.शाळा होणार डिजीटल
यावल ;- गिरडगाव जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन माजी विद्यार्थी दिपक सुरेश बारेला यांचे आजोबा नाहरसिंग खजान बारेला यांनी जि.प.मराठी शाळेला डिजीटल एच.डी.टी.व्ही.भेट दिली तर ग्रामस्थांनी आर्थीक वर्गणी करून शाळा डिजीटल होण्यासाठी मदत केली .

या कार्येक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच आशा हुसैन तडवी तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह.भ.प.पुंडलिक देवाजी तायडे होते यावेळी उप सरपंच शकीला अमर तडवी पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा कार्येअध्यक्ष व यावल तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील माजी सरपंच प्रभाकर पाटील (वाघोदा)जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक सुरेश हिलाल पाटील,सुधाकर भास्कर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान भागवत पाटील मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, कविता मॅडम,दीपक पाटील,प्रवीण पाटील महारु अन्वर तडवी,हमीद तडवी,पांडुरंग पाटील,दिलीप बारेला केंद्रप्रमुख सोनार व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेंदुर्णी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
शेंदुर्णी:– धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑफ सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता.जामनेर द्वारा संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी. येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर अण्णा बारी यांनी केले, संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर स्काऊट गाईड झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला.

५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी भारतीयम नृत्य सादर केले. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच तंबाखू मुक्तीची शपथ यावेळी देण्यात आली.या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय गरूड, संस्थेचे सचिव सागरमलजी जैन, संस्थेची सहसचिव यु. यु.पाटील, संस्थेचे कार्यालयीन सचिव दीपक गरुड, जि प सदस्य सरोजिनी गरुड, मा.पं.समिती सदस्य सुधाकर बारी, शांताराम बापू गुजर,युवा नेते स्नेहदीप गरुड, वस्तीग्रह सचिव गो.गो.सूर्यवंशी, धीरज जैन,डॉ.किरण सूर्यवंशी, प्रभाकर धनगर,प्रदीप सपकाळ, एडवोकेट प्रसन्न फासे, नितीन शिवपुजे, नारायण गरुड, रा.दे.निकम , अशोक माळी, अतुल गरुड,एस.बी.निकम, डॉ.अजय सुर्वे,पत्रकार विलास अहिरे, दिग्विजय सूर्यवंशी, कॉलेजची प्रभारी प्राचार्य श्याम साळुंखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. उदार, उपमुख्याध्यापक शशिकांत शिंदे, पर्यवेक्षक जे.एस. जुबळे, विनोद पाटील,आदी उपस्थित होते.

हिंगोणे येथे कृषी कन्यांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात

यावल ;- डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या कृषीकन्या योगिता लिपणे , वृंदा मुठ्ठे , रेवती ठाकरे ,आकांक्षा सोनवणे ,वैष्णवी ठोकळ सहभागी झाल्या. ग्रामीण मूल्यांकन रांगोळीच्या मदतीने ग्रामपंचायत कार्यालय, हिंगोणा येथे गावाच्या नकाशा काढ़न्यात आला.

त्यावेळी सरपंच रुकसाना तडवी ,वि का सो सदस्य विष्णू महाजन ,क्लर्क मुक्तार शेख, ग्राम पंचायत सदस्य श्याम महाजन ,कविता महाजन ,भैरवी पाटील छबु तडवी हे उपस्थित होते . हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक बी.एम गोणशेटवाड आणि कार्यक्रम अधिकारी प्रा . ए.डी मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला.

गणतंत्र दिनी हंबर्डी गावात कृषीकन्यांचा जल्लोष

हंबर्डी ;- ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, हंबर्डी ,ता. यावल येथे कृषी कन्या किमया नांद्रे,प्रियंका पाटील, भाग्यश्री साबळे ,जानकी विसपुते ,यज्ञश्री महाजन .यांनीभव्य ग्रामीण मूल्यांकन ( PRA) रांगोळी च्या मदतीने काढला. तसेच विविध कार्यक्रम राबवण्यात आले ,यात ध्वजारोहण, प्रभातफेरी, ग्रामपंचायत,ग्रामसेविका इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त, बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली. जि.प.प्राथमिक शाळेत कृषी कन्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. मत्ते व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.

सावदा येथे 110 फुटी राष्ट्रध्वजाचे लोकार्पण

सावदा ;- सावदा ता.रावेर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृत पुतळ्याजवळ प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधुन आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या माध्यमातुन मंजुर 110 फुटी राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख नंदकिशोर महाजन, संजना चंद्रकांत पाटील, अतुल सरोदे, नगरपालिका मुख्याधिकारी हर्षल सोनवणे, सावदा पोलीस स्टेशन चे ए.पी.आय. जालिंदर पळे, शहराध्यक्ष सूरज परदेशी, सारिका चव्हाण, रेखाताई बोंडे, हेमांगीताई चौधरी, नंदाताई लोखंडे, रमाकांत तायडे, वेडू लोखंडे, दिपक बडगे इ.तसेच युवक बौध्द पंच ट्रस्ट सदस्य व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

जि.प.शाळा वडगाव कडे येथे प्रजासत्ताक दिन साजरा

शिदाड ता . पाचोरा ;- तालुक्यातील कडे वडगाव येथे 75 वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साह वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सर्वप्रथम राष्ट्रध्वज शालेय समितीचे अध्यक्ष गोकुळ दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला तसेच राज्यगीत घेण्यात आले विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली.

यानंतर पहिली ते सातवीचे विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ घेण्यात आले. स्पर्धा परीक्षांमध्ये खेळांमध्ये नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा वही पेन देऊन सन्मान करण्यात आला या वेळेस जि.प सदस्य मधुभाऊ काटे, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष,माजी सरपंच, पोलीस पाटील भा.ज.पा.आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील,ग्रामसेवक सत्रे आप्पा, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व ग्रामस्थव तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतीशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिन पार पडला.

सावदा नगरपरिषदेतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात

सावदा ;- सावदा नगरपरिषदे तर्फे नगरपालिकेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हर्षल सोनवणेयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर कन्या शाळेच्या मुलींनी जनगणमन राष्ट्रगीत सादर केले त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या फलकास पुष्पहार अर्पण अर्पण करण्यात आला. यानंतर सावदा नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा ४.० अंतर्गत “पर्यावरण पूरक स्नेही बाप्पा” स्पर्धा घेण्यात आलेली होती त्यात सार्वजनिक व घरगुती अशा दोन गटांचा सहभाग होता.

सार्वजनिक गटामधून जगमाता मित्र मंडळ ही एकच एंट्री प्राप्त झाल्याने प्रथम बक्षीस रक्कम रु. ५०००जगमता मित्र मंडळ यांना व घरगुती गटामधून प्रथम बक्षीस समर्थ अकॅडमी रक्कम रु. १५००/- मात्र, द्वितीय बक्षीस सतीश ललित बढे रक्कम रु. १००० व तृतीय बक्षीस हृदया राकेशकुमार पाटील रक्कम रु. ७०० प्रजासत्ताक दिनारोजी परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवर आजी-माजी नगरसेवक नगराध्यक्ष नगरपरिषद कर्मचारी, आ. ग. हायस्कूल व वि. ह. पा. विद्यमंदिर चे शिक्षक रुंद, गृहरक्षक दलाचे कर्मचारी, एन. सी.सी. चे विद्यार्थी, पत्रकार बांधव व गावातील नागरिक उपस्थित होते.

प्रजासत्ताकदिनी हिंगोणा येथे विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप
हिंगोणा ता यावल ;- हिंगोणा येथील जी प प मराठी मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले . हिंगोणा . जि प मराठी मुलांच्या शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विलास भालेराव ,ग्रामपंचायत सदस्य छबु तडवी ,शाळेचे मुख्याध्यापक हेमंत बोरोले, प्रमोद सोनार, छाया वायकोळे ,शशिकांत वायकोळे, सुनीता बोरोले, यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.