मनवेल आश्रमशाळेत ‘महापुरुषांच्या अश्रुधारा’ नाटकाचे सादरीकरण

0

लोकशाही न्युज नेटवर्क

येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी ‘महापुरुषांच्या अश्रुधारा’ हे नाटक शाळेत व मनवेल गावात ठिकठिकाणी सादर केले. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनवेल आश्रमशाळेत ध्वजारोहण अधीक्षक वसंत हिंमतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

देशाचे चित्र बघून हे महापुरुष दुःखी आहेत. त्यांचे दुःख, महापुरुषांचे विचार नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधीजी, मावळा यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महापुरुषांच्या अश्रुधारा या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन शिक्षक राकेश महाजन यांनी केले.

ध्वजारोहण कार्यक्रमाला मनवेल आश्रमशाळा संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील, सचिव मीरा पाटील, संस्थेचे ज्येष्ठ सभासद देवीदास पाटील, मंगलराव पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामण पाटील उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे, माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील, अधीक्षक वसंत पाटील, अधिक्षिका सरीता तडवी, ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील, शिक्षक सुभाष पाटील, राकेश महाजन, नितीन चौधरी, कैलास बेलदार, कमलाकर इंगळे, विजय चव्हाण, इंद्रजित पाटील, राजेश भारूळे, राजू पावरा, मोहीत अत्तरदे, महंमद तडवी, दिपक ढाके, चंद्रशेखर पाटील, चेतन चौधरी, भारती मरसाळे, संदीप पाटील, भाऊसाहेब नारायण पाटील यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.