विकेंडला ट्राय करा भन्नाट पनीर टिक्की, पहा रेसिपी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

विकेंडला आला की, अनेक गृहिणी घरच्यांसाठी अनेक नवनवीन पदार्थ ट्राय करतात. चमचमीत पदार्थाची चव चाखण्यासाठी त्या नवीन रेसिपी बनवत असतात. अशातच सगळ्यांना अडवणारे आणि सगळीकडे उपलब्ध असते ते पनीर.

पनीर हे फक्त टेस्ट नाही तर, ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. कधीकधी पनीरची ग्रेव्ही बनवताना अधिक वेळ लागतो. आता पर्यंत अनेकदा आलू टिक्कीची चव चाखली असेल, पण आज आम्ही तुम्हाला पनीरची टिक्की कशी बनवायची याविषयी सांगणार आहोत ते पाहूया.

१. साहित्य

  • पनीर-२५० ग्रॅम
  • मीठ-चवीनुसार
  • लाल मिरची पावडर-१ टीस्पून
  • हिरवी मिरची – ३ (बारीक चिरून)
  • जिरे- १ टीस्पून
  • बेसन-अर्धी वाटी
  • काजू- १ टीस्पून
  • काळे मीठ- १ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • तूप – १ टीस्पून

 

2. कृती

सर्वात आधी पनीर धुवून किसून घ्या. त्यात लाल तिखट, हिरवी मिरची, काळी मिरी, काजू पावडर आणि सर्व मसाले घालून मिक्स करा.

मिश्रण नीट मिक्स केल्यानंतर बेसन आणि तूप घालून टिक्की बनवा.

पॅनवर मंद आचेवर तेल गरम करुन घ्या. नंतर टिक्की एक एक करुन तळून घ्या.

टिक्की लालसर झाल्यावर आता एका प्लेटमध्ये काढून लाल आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Leave A Reply

Your email address will not be published.