झटपट बनवा यम्मी पास्ता विथ टोमॅटो सॉस

0

खाद्यसंस्कृती विशेष

पास्ता म्हटलं म्हणजे सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पास्ता बनवला जातो. चला तर मग आज आपण पास्ता विथ टोमॅटो सॉस कसा बनवायचा तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने..

 

साहित्य 

टोमॅटो सॉस बनवण्यासाठी

• ६ टोमॅटो मध्यम आकाराचे (लालबुंद, पिकलेले असे वापरावेत.)

• १ मोठा कांदा, बारीक चिरून

• १० पाकळ्या लसुण, बारीक चिरून

• १ टीस्पून मिक्स हर्ब्स

• १ टीस्पून काळी मिरी पूड किंव्हा कुटून

• १ टीस्पून चिली फ्लेक्स

• १/२ टीस्पून लाल मिरची पूड

• २ टीस्पून टोमॅटो केचप

• ३ टेबलस्पून ऑलिव ओईल किंव्हा बटर

• मीठ चवीनुसार

• १ कप पाणी

 

पास्ता बनवण्यासाठी

• १ पाकीट पास्ता (२५० ग्रॅम )

• टोमॅटो सॉस- वर कृती दिली आहे

• १/४ कप गाजर, छोटे चौकोनी तुकडे करून

• १/२ कप ब्रोक्कोली

• १/२ कप सिमला मिरची

• १/४ कप बेबी कॉर्न्स, छोटे तुकडे करून -(किंव्हा स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले – १/४ कप)

• ऑलिव ओईल किंव्हा बटर जरुरीप्रमाणे

• १/४ कप चीज,किसलेले

• मीठ चवीनुसार

 

कृती:

टोमॅटो सॉस बनवण्यासाठी

• पाणी उकळत ठेवा. उकळी आली की त्यात टोमॅटो टाकून २-३ मिनिटे शिजवून घ्या. सालाला तडे गेले की समजावे टोमॅटो शिजले.

• थंड झाल्यावर साले काढून टोमॅटोचे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी बनवा.

• प्यान मध्ये तेल गरम करून कांदा आणि लसूण गुलाबी रंगावर परतून घ्या.

• त्यात मिरची पूड आणि मीठ घालून परता.

• त्यात टोमॅटो प्युरी, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, टोमॅटो केचप व पाणी टाका. (शक्यतो टोमॅटो शिजवण्यासाठी वापरलेलेच पाणी वापरा. ) छान एकत्र करून उकळी येऊ द्या. मध्ये मध्ये ढवळत रहा.

• हा सॉस तुम्हाला लगेच वापरायचा नसेल तर थंड करून फ्रिझरमध्ये ठेवा. महिनाभर चांगला राहील.

 

पास्ता बनवण्यासाठी

• पास्ताच्या पाकीटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे पास्ता शिजवून घ्या. (पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ घाला. उकळी आली की पास्ता टाकून ८-१० मिनिटे शिजवा. जास्त शिजऊ नये, मऊ पडतो. शिजला की चाळणीमध्ये ओतून निथळत ठेवा. वरून थंड पाणी ओता.)

• थोड्याश्या तेलावर मीठ आणि मिरी पूड घालून सर्व भाज्या एक एक करून २-३ मिनिटे परतून घ्याव्यात.

• वर सांगितलेला टोमॅटो सॉस उकळत ठेवावा, त्यात परतलेल्या भाज्या, उकडलेला पास्ता, किसलेले चीज घालून व्यवथित एकत्र करून घ्या.

• वरून किसलेले चीज घालून गरमागरम वाढा आणि गरमागरम खा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.