भारतीय रेल्वेच्या नियमांत मोठा बदल ; जाणून घ्या नवा नियम

0

नवी दिल्ली ;- भारतीय रेल्वेने 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून रेल्वेच्या नियमांत मोठा बदल केला आहे. आता भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 1 एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना महागात पडू शकते. जर विना तिकीट रेल्वेमध्ये प्रवास करताना पकडले गेलात तर आता ऑनलाईन दंड भरावा लागू शकतो.

भारतीय रेल्वेने हा दंड भरण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकरण्याची पद्धत सुरु केली आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 1 एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल रेल्वे करणार आहे. या नियमामुळे रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे प्रवाशांना महागात पडू शकते. त्यामुळे प्रवाशांकडून आता क्यूआर कोड स्कॅन करुन दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी रेल्वे तिकीट तपासणीसांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन प्रदान करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान विनातिकीट पकडले गेल्यास आणि कॅश नसेल तर अशावेळी डिजीटल पेमेंट करु शकतो आणि तुरुंगात जाण्यापासून वाचू शकतो. तसेच रेल्वे तिकीट घरांसमोरील प्रवाशांची गर्दी पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.