आयपीएल सुरु असतांनाच इंग्लंडच्या कर्णधाराने बदलले आपले नाव…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जगातील कोणतीही व्यक्ती त्याच्या नावाने ओळखली जाते. पण कधी कधी माणसाच्या नावाचे स्पेलिंग वेगळे असते आणि त्याचा उच्चार वेगळा असतो. आता आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जोस बटलरने आपल्या नावाचे स्पेलिंग सुधारले आहे. इंग्लंड क्रिकेटने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने हा खुलासा केला आहे.

जोस बटलरने मोठी घोषणा केली

जोस बटलरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हाय, मी इंग्लंडचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार जोस बटलर आहे. पण मला आयुष्यभर चुकीचे नाव दिले गेले. रस्त्यावरचे लोक मला गुड मॉर्निंग जोश म्हणतात. माझ्या आईनेही वाढदिवसाच्या कार्डमध्ये लिहिले आहे, प्रिय जोश, तू मोठा होत आहेस. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप प्रेम आई. एवढच नाही तर मिळालेल्या मेडलवरही माझे नाव चुकीचे लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये जोस बटलर पुढे असे म्हणताना ऐकू येत आहे की, 13 वर्षे देशासाठी खेळल्यानंतर आणि दोन विश्वचषक जिंकल्यानंतर आता ही समस्या दूर करण्याची वेळ आली आहे. आता मी अधिकृतपणे जोश बटलर आहे. पण व्हिडिओच्या शेवटी निर्माता त्याला जोश नाही तर जोस म्हणत आहे. यानंतर जोस रागाच्या भरात पेन फेकतो. आज 1 एप्रिल आहे आणि जोस बटलरने एप्रिल फूल साजरा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला असावा.

राजस्थान रॉयल्स संघाचे सदस्य

जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने २०२२ च्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. बटलर इंग्लंडसाठी एकदिवसीय विश्वचषक 2019 विजेत्या संघाचा देखील सदस्य होता. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो आणि त्याने राजस्थान रॉयल्स संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. बटलरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 98 सामने खेळले असून त्यात त्याने 3245 धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाच शतकेही झळकावली आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.