अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाईस गेलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याला मारहाण

0

पाचोरा ;- तालुक्यातील वड़ीशेवाळे गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला चापटबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून याबाबत एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, योगेश यशवंतराव सूर्यवंशी हे रा. खोटे नगर जळगाव येथे वास्तव्याला असून ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत . २६ रोजी प्रजासत्ताक दिनी दारू विक्री बंद असताना पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे गावात दारूबंदी कारवाई करण्यासाठी गेले असता आरोपी ललित विनोद पाटील रा. पाचोरा याने योगेश सूर्यवंशी यांना सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास माझ्यावर कारवाई कशी केली . हिम्मत कशी काय झाली तुम्हाला पाचोर्यात फिरणे मुश्किल करून टाकेल. माझ्यावरील कारवाई मागे घ्या अशी दमदाटी करून सूर्यवंशी यांना चापतांबुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ललित पाटील याच्या विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.