जपानने बनविले ६ जी डिव्हाईस ; चीनला मागे टाकले

0

टोकियो ;-जपानने हाय-स्पीड 6G साठी जगातील पहिले प्रोटोटाइप डिव्हाइस सादर केले आहे. या ग्राउंडब्रेकिंग डिव्हाइसमध्ये 100 गीगाबिट्स प्रति सेकंद (Gbps) च्या प्रभावी दराने डेटा प्रसारित करण्याची क्षमता आहे, 300 फूट पेक्षा जास्त अंतर कव्हर करते. सध्याच्या 5G तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे 20-पट सुधारणा दर्शवते. जपानमध्ये पहिले 6G डिव्हाइस प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहे. यामध्ये जपान हा पहिला देश ठरल्याने त्याने चीनला मागे टाकले आहे. 6G डिव्हाइस 100 Gbps चा स्पीड देत असल्याने सगळ्यांनी याला मोठी पसंती दिली आहे. मात्र या सगळ्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. चीनला हे उपकरण बनवायचे होते, मात्र चीनचे हे प्रयत्न फसले. चीनने हे उपकरण तयार केले असते तर चीनचा प्रभाव सर्व देशांवर पडला असता. तसेच दूरसंचार क्षेत्राच्या माध्यमातून इतर देशांमध्ये हेरगिरी करता आली असती.

जपानच्या मदतीने भारतामध्ये बुलेट ट्रेन मेट्रोसारखे अनेक मोठे प्रकल्प बनवण्यात आले. त्यामुळे भारताला 6G मध्ये जपानकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. भारताने देखील 6G च्या निर्मितीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

6G डिव्हाइसचा वेग 300 फूट क्षेत्र आहे. आजच्या 5G पेक्षा 20 पट अधिक वेगवान आहे. याची चाचणी 11 एप्रिल रोजी करण्यात आली. प्रोटोटाइप डिव्हाइस 100 Gbps ची गती प्राप्त करेल. चाचणी एकाच उपकरणावर केल्याने आगामी काळात 6G व्यावसायिकरित्या याद्वारे अनेक उपकरणे एकाच वेळी जोडली जाणार आहेत. 5G ची कमाल गती 10Gbps असून त्यक्षात गती 200mbps पर्यंत असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.