मायावतींनी केले भाजपला मत देण्याचे आवाहन ?, व्हायरल व्हिडिओचे सत्य

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान सोशल मीडियावर बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या भाजपला मतदान करण्यासाठी सांगत असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती असे म्हणताना ऐकू येते की, नरेंद्र मोदींनी तुम्हाला मोफत धान्य दिले आहे, त्यामुळे तुम्हाला भाजपला मत देऊन याची परतफेड करायची आहे. निवडणुकीत भाजपला मतदान करुन त्यांचे हे ऋण तुम्हाला मतदान करुन फेडावे लागेल.

हा व्हिडिओ ट्विटरवर अनेक युजर्सनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोदी का परिवार नावाच्या युजरने शेअर करत लिहिले, की मायावती यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे. जय भाजपा, विजय भाजपा, जय श्रीराम. या पोस्टचे अर्काइव वर्जन इथे आणि इथे पाहता येऊ शकते.

काय आहे व्हिडिओ मागचं सत्य?

मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची पडताळणी केली असता, तो अर्धवट असल्याचे समोर आले. मूळ व्हिडिओमध्ये बसपा प्रमुख मायावती यांनी भाजप आणि आरएसएसवर नरेंद्र मोदी सरकारने दिलेल्या मोफत रेशनच्या नावावर मते मागितल्याचा आरोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.