स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ एरंडोलात पदयात्रा

0

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल शहरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

शहरातील ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोशाचे वातावरण होते. यावेळी “अबकी बार मोदी सरकार’’ या घोषणांनी शहरातील प्रत्येक भाग दणाणून गेला होता. त्यासोबतच पदयात्रेत सामील नागरिकांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी खासदार ए.टी. नाना पाटील, अमोल पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, मच्छिन्द्र पाटील, रमेश परदेशी, वासुदेव पाटील, उज्वला पाटील, रवी जाधव, राजाभाऊ पाटील, परेश पाटील, सुनील पाटील, अतुल पवार, सचिन पानपाटील, ज्ञानेश्वर आमल, डॉ. नरेंद्र ठाकूर, कुणाल महाजन, निलेश परदेशी, मनोज पैलवान, जगदीश ठाकूर, समाधान पाटील, बबलू पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, कुणाल पाटील, पिंटूभाऊ राजपूत, शामभाऊ ठाकूर, अमर राजपूत, सचिन विसपुते, नितीन महाजन, विवेक ठाकूर, योगेश महाजन, केतन सोनी, मायर ठाकूर, आनंद दाभाडे, छाया दाभाडे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, विशाल सोनार, अभिजित पाटील, आनंदा चौधरी, शालीक गायकवाड, मयूर महाजन, सुभाष पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.