सावदा येथे रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रॅली

0

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ सावदा येथे रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार दि. 8 रोजी सकाळी रक्षा खडसे यांची प्रचार रॅली काढण्यात आली. सावदा शहर येथे प्रचारार्थ भेट देऊन मुख्य रस्त्याने “महाविजय संकल्प रॅली” काढून मतदारांशी संवाद साधला व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.