११ ते ४ यावेळेत घराबाहेर जाणे टाळा ; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

0

नवी दिल्ली ;- देशासह महराष्ट्रात आणि विशेषतः खान्देशात उष्णतेची लाट असून तापमान ४३ अंशावर जाऊन पोहचल्याने आता केंद्रीय आरोग्या मंत्रालयाने नागरिकांनी शक्यातो ११ ते ४ यावेळेत घाराबाहे जाणे टाळावे असा सल्ला दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून सर्वसामान्यांना काळजी घेण्याचा सल्ला देतानाच काही सूचना केल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान वाढल्याने अनेकदा काही लोक बेशुद्ध होतात. अशा परिस्थितीत सर्वप्रथम बेशुद्ध व्यक्तीला पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु असे केल्याने त्याच्या फायद्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते. बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला बळजबरीने पाणी पाजण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीच्या घशाचे स्नायू नियंत्रणात राहात नाहीत, त्यामुळे संबंधित व्यक्तीला गुदमरल्यासारखे होऊ शकते. याशिवाय, श्वासोच्छवासाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

  • उन्हाळ्यात आपली मुले किंवा पाळीव प्राणी यांना उद्यानात किंवा कोणत्याही वाहनात सोडू नका.
  • अनवाणी बाहेर जाऊ नका.
  • जंक फूडऐवजी फळे, सॅलड आणि घरी बनवलेले पदार्थ यांचा आहारात समावेश करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.