चोपडा तालुक्यातून १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

0

चोपडा ;– तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय मुलगी सायंकाळी ५ वाजता गावातील श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली.

मात्र ती परत न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला असता मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.