भडगाव तालुक्यातून १४ वर्षीय मुलाला पळविले

0

भडगाव ;- तालुक्यातील एका गावातून अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन पळवून नेल्याचा प्रकार २५ रोजी रात्री साडेदहानंतर उघडकीस आला असून याप्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षांच्या निलेश पाटील याला २५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजेनंतर ते २६ जानेवारीच्या पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याचा प्रकार उघडकीस आला . त्याचा शोध घेऊनही तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून २६ रोजी रात्री ८ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.