चाळीसगाव ,पाचोरा येथील तरुण , प्रौढाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

जळगाव ;- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील ३५ वर्षीय तरुणाचा तर पाचोरा शहरातील ५४ वर्षीय प्रौढाचा ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू ओढवल्याच्या घटना समोर आल्या असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी कि, टाकळी ता. चाळीसगाव येथील मिलिंद देविदास मराठे वय ३५ याला मयत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वैद्यकीय कळविल्याने याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
.
तसेच दुसर्या घटनेत पाचोरा षश्रतील कृष्णापुरी भागात राहणारे यशवंत जगन्नाथ शिंपी वय ५४ हे घरात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मयत झाले . त्यांचा मुलगा दुर्गेश शिंपी यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी मयत घोषित केले. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.