Netflix चा युजर्सला मोठा झटका, ‘हा’ प्लान होणार बंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चित्रपट किंवा आपल्या आवडणारी वेबसिरीज प्रत्येकालाच निवांतपणे बसून पाहण्याची आवडत असते. हल्ली व्यस्त जीवनशैलीतून प्रत्येकाला ते पाहता येत नाही. म्हणून त्यांना मिळेल त्या ठिकाणी ते पाहण्याचा अट्टाहास प्रत्येक जण करत आहे.

Netflix हा ओटीटी प्लॅर्टफॉर्म सर्वाधिक पहिला जाणार अॅप आहे. यावर पाहता येणाऱ्या सिरीज प्रत्येकजण वेगवेगळ्या पैशांमध्ये पाहतात. अशातच लवकरच Netflix चा सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लान बंद होणार आहे. त्यामुळे युजर्सच्या मनोरंजनाला ब्रेक लागेल. कंपनीने असे म्हंटले आहे की, गेल्या २ ते ३ वर्षांपासून महसुलाबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कॅनडा आणि ब्रिटनमधून Netflix ला काढून टाकण्यात आले आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने नवीन कमाई अहवाल सदर केला. या अहवालाच्या आधारे कंपनी मोठा निर्णय घेणार आहे.

२०२३ मध्ये चौथ्या तिमाहीच्या अहवालात असे म्हंटले आहे की, Netflix च्या एकूण साइनअप खात्यांपैकी ४० टक्के बेसिक अकाउंट ज्यामध्ये ऍड सपोर्ट आहे. त्यासाठी कंपनीने सगळ्यात स्वस्त प्लान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Netflixने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काही देशांमध्ये अनेक प्लानची किंमत वाढवली. याआधी प्लानची किंमत १० यूएस डॉलर आणि ७ युरो होती. यानंतर ऑक्टोबरमध्ये या प्लानची किंमत १२ यूएस डॉलर आणि ८ युरो करण्यात आली. गेल्यावर्षी जुलैमध्ये अनेक नवीन ग्राहकांसाठी मूलभूत लभूत योजना काढून टाकण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.