वेट लॉस्टसाठी ‘संत्री’ आहे लाभदायक, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सगळ्यात लठ्ठपणाच्या समस्या जास्त प्रमाणात वाढत आहे. मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करतो. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की वाढलेले वजन कमी करण्यासाठी फळे अतिशय फायदेशीर आहे. फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि मिनरल्सचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, फळांचा आहारात समावेश करणे हे फायद्याचे आहे.

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी लिंबूवर्गीय फळे महत्वाची आहे. या फळांमध्ये संत्रा या फळाचा समावेश आहे. वजन कमी करण्यासाठी संत्रा हे फळ अतिशय फायदेशीर आहे. कसे ते जाणून घेऊया.

व्हिटॅमिन सी
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते. विविध संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला दूर ठेवते. या व्यतिरिक्त शरीरातील पचनक्षमता सुरळीत ठेवण्याचे काम संत्रा करते आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते.

कॅलरीजचे प्रमाण कमी
संत्र्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येता. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे. संत्र्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.