.. तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो ; एकनाथ खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना आव्हान

0

जळगाव ;- राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्या आजारपणावर शंका उपस्थित केली होती. सहानुभूती मिळविण्यासाठीचा खटाटोप असे त्यांनी म्हटले होते. मला नाटक करण्याची कधी गरज पडत नाही व तो माझा धंदाही नाही. , माझ्या आजारपणाचे सगळे कागदपत्रे तपासा, जर माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो. असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.
https://pbs.twimg.com/ext_tw_video_thumb/1727662514400354304/pu/img/ZNHSA9cHyrRm8yea?format=jpg&name=small
मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथराव खडसे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते जग जाहीर त्याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार खडसे यांनी म्हटले आहे की,गिरीश महाजन यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली. मला वाटतं त्यांचं वय साठ वर्षांचं होत आलंय त्यामुळे साठी आणि बुद्धी नाठी असं होतंय. त्यामुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय.

. त्यांना जर खात्री करायची असेल तर माझी कागदपत्रं तपासावीत त्यात कार्डिअॅटिक अरेस्ट काय असेल तो देखील पाहून घ्यावा. माझं हृदय बंद पडलं होतं. बंद पडलेलं हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टरांना करावे लागले. ७० ते ८० लाख लोकांमधून एखादा अशा अवस्थेतून परत येतो, तसा मी परत आलो. कारण संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते. पण आता गिरीश महाजन यांना हे कसं कळणार?” असा सवाल खडसे यांनी या व्हिडीओत केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.