धक्कादायक; अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेतील ओहायो मध्ये २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा कारमध्ये मृतदेह आढळला आहे. हा तरुण सिनसिनाटी विद्यापीठात शिक्षण घेत होता. विद्यार्थ्याचं नाव आदित्य अदलखा असे असून ओहायो येथील डब्लूएलडब्लूटी वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिनसिनाटीच्या वेस्टर्न हिल्स वायाडक्ट वर आदित्य गाडी चालवत असतांना त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचा मृतदेह कारमध्ये आढळला असून, त्या कारने दुसऱ्या एका कार्ल धडक दिली होती. ड्रायव्हिंग सीताच्या खिडकीतून तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

गोळीबार झाल्यानंतर यूसी मेडिकल सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी आदित्यचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.