नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकच्या निफाड जवळ एसटी महानंदलाच्या रातराणी बस व मालवाहू ट्रक मध्ये झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-छत्रपती संभाजी महामार्गावर निफाडच्या आचोळे फाट्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान राज्यातील विविध जिह्यात झालेल्या अपघातात एक जण ठार तर सात जण जखमी झाले आहे.
भुयार मार्गावर अपघात
औषधी घेऊन गावाकडे लाखांदूर तालूक्यातील भुयार येथून स्वागवी निमगाव येथे येत असतांना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना निष्ठी-भुयार मार्गावर घडली आहे. या घटनेत एकाच जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अक्षय डडमल यांचा मृत्यू झाला आहे.