ट्रक मागे घेतांना धडकेत वॉचमन जखमी ;उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव एमआयडीसी येथील घटना

जळगाव:- शहरातील एम सेक्टर येथील एका कंपनीत माल खाली करण्यासाठी आलेल्या ट्रक मागे घेत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या धडकेत कंपनीचा वाचमन जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एमआयडीसी परिसरातील तुळजाई नगर येथील रहिवासी असलेले सुखदेव सापकर वय 65 हे एम सेक्टर मधील जीबी इंडस्ट्रीज येथे कामाला असून ते आज दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास कंपनीच्या गेटवर ड्युटी करीत असताना कंपनीमध्ये माल खाली करण्यासाठी आलेला ट्रक क्रमांक एम एच 28 बीबी 53 99 वरील चालकाने ट्रक मागे घेत असताना सुखदेव सापकर यांना ट्रकची धडक लागल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ओम क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांचा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रक वरील चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी ज्ञानेश्वर हरणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला ट्रक ड्रायव्हर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.