Saturday, January 28, 2023

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

- Advertisement -

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. परवा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी वीस जागांसाठीचे चित्र स्पष्ट झाले. सर्वपक्षीय पॅनलचा प्रयत्न फसल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि शिंदे भाजप गट असे सरळ दोन पॅनल होतील असे वाटत असताना एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) शह देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) काही उमेदवार शिंदे भाजप गटाने गळाला लावले. त्यातच पाचोर्‍याचे राष्ट्रवादी माजी आमदार दिलीप वाघ (Dilip Wagh) यांच्यासाठी विद्यमान शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (MLA Kishore Patil) यांनी ऐनवेळी आपली माघार घेण्याची खेळी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वाघांना पाठिंबा जाहीर केल्याने दिलीप वाघ यांची बिनविरोध निवड होणार आहे. जिल्ह्यातील दोन मंत्री, दोन खासदार आणि सात आमदारांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

येत्या दहा डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार असताना अचानकपणे महाराष्ट्र शासनाने सहकार क्षेत्रातील अ, ब, क आणि ड वर्गातील निवडणुकांना 18 डिसेंबर पर्यंत स्थगिती दिली. आताचा निवडणूक कार्यक्रम पुढे कायम राहील, असा तो आदेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण सरकार देत असले, तरी गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय शासनाने घेतला असल्याचे बोलले जाते. सध्या सत्ताधारी राजकीय पक्षातर्फे कोणते आणि कसे निर्णय घेतले जातील हे सांगता येत नाही.

- Advertisement -

‘ज्याचे हाती ससा तो पारधी’ ही मराठी म्हण आहे. गुजरात निवडणुकीसाठी एक डिसेंबर आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होत आहे. 8 डिसेंबरला मतमोजणी होणार. गुजरात निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप नेत्यांना वेळ मिळाला म्हणून दूध संघाची निवडणूक पुढे ढकलली, असे बोलले जाते आहे. यात तत्यांशी नाही असे म्हणता येणार नाही. त्याचबरोबर जिल्हा दूध संघात शिंदे व भाजप हे दोन्ही निवडणुकात उतरले असताना प्राप्त परिस्थितीत बहुमत मिळवण्याची शक्यता वाटत नसल्याने निवडणूक स्थगिती केली असल्याचे सांगण्यात येते किंवा अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आणले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या या निर्णयात राजकारण नाही असे कितीही म्हटले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.

निवडणूक रद्द करण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली. अन् शासनाने मात्र ती स्थगित केली. हा एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत जिल्हाभरात फक्त 441 आमदार मतदार असताना, ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची बनण्याचे कोडे मात्र कळत नाही. कारण ऐनवेळी निवडणूक नियमात बदल करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर मात केली. गेले आठ दिवस राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाने जिल्ह्यात खळबळ उडाले. अगदी खालच्या थराला जाऊन वार पलटवार केले. आता हे आरोप प्रत्यारोप थांबविले पाहिजे असा सूर उमटला. राजकारण सत्तेच्या हव्यासापोटी कोलांटी उड्या मारणाऱ्या नेत्यांची अलीकडे चलती आहे. परंतु सहकार क्षेत्रात राजकारण असावे या भूमिकेतून आम्ही सहकार निवडणुकीकडे पाहतो अशी शेकी मिरवून स्वतःची पाठ हे नेते थोपटून घेतात.

जळगाव जिल्ह्यात चोपडा सहकारी सूतगिरणी आणि जिल्हा दूध संघ या दोन महत्त्वाच्या संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यात चोपडा सूत गिरणीची निवडणूक महा विकास आघाडी पॅनलतर्फे एकतर्फी होईल, असे स्पष्ट चित्र आहे. जिल्हा दूध संघ निवडणुकीत चुरस आहे. त्यामुळे स्थगितीनंतर होणाऱ्या दूध संघ निवडणुकीत कोण बाजी मारेल? याकडे मात्र जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे