भोकर येथे ५३ वर्षीय प्रौढांच्या घेतला गळफास

0

जळगाव ;- तालुक्यातील भोकर येथे एका ५३ वर्षीय प्रौढ व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , बहादूर रामसिंग बारेला वय ५३ यांनी भोकर शिवारातील शेतामध्ये गळफास घेतल्याची घटना १३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली . नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता सीएम डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले . याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोना ईश्वर लोखंडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.