जळगावात घरफोडी साडे तीन लाखांचा मुद्देमाल चोरी

0

जळगाव ;- शहरातील गणपती नगरजवळील मनीषा कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी रोकडसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार १२ रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, विशाल नरेंद्र जैन वय ४५ यांचे मनीषा कॉलनीत घर असून ते लग्नासाठी कुटुंबियांसोबत ९ जून रोजी नागपूर येथे गेले होते . ९ ते १२ जूनच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटामधून ३ लाख २५ हजारांची रोकड , १ लाख ३३ हजारांचे सोन्या चांदिचंद आगीने असा एकूण ३ लाख ५८ हजारांचा ऐवज लुटून नेला . नरेंद्र जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.