जळगावात तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

0

जळगाव (प्रतिनिधी) – पंख्याला गळफास लावून येथील सुप्रीम कॉलनीमधील रहिवासी तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्रकार आज ९ रोजी सकाळी उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कैलास जानराव कोळी (वय ३६, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो हातमजुरी करून उदरनिर्वाह करायचा . आज शुक्रवारी सकाळी १० वाजता घरी कोणी नसताना त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. कुटुंबीयांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे सीएमओ रेणूका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले.
यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांनी आक्रोश केला. मयत कैलास कोळी यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.