टीम इंडियाने लंकादहन करत केला विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ३३ वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. आणि भ्तीय संघाने हा सामना तब्बल 302 धावांनी जिंकला.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जिथे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या. यादरम्यान विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार खेळी खेळली. दुसऱ्या डावातही टीम इंडियाचा दबदबा कायम राहिला. जिथे त्यांनी श्रीलंकेला 55 धावांत ऑलआउट करून सामना जिंकलाच शिवाय उपांत्य फेरीतील आपले स्थानही निश्चित केले.

भारतीय संघाकडून मोहोम्मद शमी ने ५ विकेट घेतल्या. तर सिराज च्या खात्यात ३, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.