मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती चिंताजनक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल आपले आमरण उपोषण सोडले आहे. सर्वपक्षीय विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरंगे यांची प्रकृती आणखी खालावली आहे. जरांगे यांची दिवाळी रुग्नालयातच जाणार असल्याचा अंदाज आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होत त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे २ आठवडे मनोज जरांगे-पाटील यांना रुग्णालयातच मुक्काम करावा लागणार आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत त्यांना यावेळी जास्त अशक्तपणा आहे. तसेच वजन देखील जास्त घटलं आहे. लिव्हर आणि किडनीचे पॅरामीटर देखील डिरेंज झाले आहेत. ब्लड प्रेशरही कमी आहे. या दृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.