इंडिया आघाडीची आगामी बैठक मुंबईत होणार !

0

मुंबई ;- विरोधी पक्षांच्या (इंडिया आघाडी) नेत्यांची पहिली बैठक पाटणा व दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडल्यानंतर आता विरोधी आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार असून इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. आधी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्टला ठरली होती. मात्र, आता ही बैठक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणार असल्याचं कळतंय. मुंबईतील हयात हॉटेल इथे ही बैठक पार पडणार आह इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद ठाकरे गटाकडे आहे. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या वतीने डिनरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज वरळी येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचीही उपस्थिती होत

नाना पटोले यांनी जाहीर केलं की, इंडिया आघाडीची आगामी म्हणजेच तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रजी पार पडेल. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करत आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष ठाकरे गट, शरद पवार गट आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी पाच नेत्यांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे. हे १५ नेते बैठकीचं नियोजन करतील. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या पथकात असतील.

यावेळी नाना पटोले म्हणाले आमच्याबरोबर उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत. हे दोन नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. यांच्याबरोबर मिळून आम्ही या बैठकीचं नियोजन करत आहोत. राहुल गांधी याच्यावरील खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काल (४ ऑगस्ट) दिलेल्या निकालानंतर देशभरात आनंदाचं वातावरणं आहे. काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेदेखील या बैठकीला येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.