ब्रेकिंग : जळगावच्या पाच गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई !

0

जळगाव ;– शहरातील कांचन नगरातील चौगुले प्लॉट परिसरात राहणाऱ्या ५ गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेशानुसार २ वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले असून या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारींमध्ये खळबळ उडाली आहे

जळगाव जिल्ह्यात टोळीने करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातच जळगाव शहरातील कांचन नगरात राहणारे टोळीप्रमुख हितेश संतोष शिंदे (वय-२५), टोळी सदस्य संतोष उर्फ जागो रमेश शिंदे (वय-४५), आकाश उर्फ नाकतोड्या संजय मराठे (वय-२२), सुमित उर्फ गोल्या संजय मराठे (वय-२७) आणि संजय देवचंद मराठी (वय-५०) सर्व रा. चौगुले प्लॉट, कांचन नगर, जळगाव हे खून प्रयत्न करणे, जबरी चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी तसेच पोलिसांच्या आदेशाची उल्लंघन करणे या स्वरूपाचे वेगवेगळे ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. या अनुषंगाने या टोळीला हद्दपार करण्याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी हद्दपार करण्याचा प्रस्ताव प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना पाठवला. त्यानुसार त्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करत हद्दपारिला मंजूर देण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हद्दपार करण्याचे आदेशाला मंजुरी दिली. दरम्यान या पाचही जणांना २ वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे.

पाचही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अहवालासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक फौजदार संजय शेलार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विन हडपे, परीष जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल गेटे, मुकुंदा सोनवणे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख सुनील दामोदरे यांनी काम पाहिले. दरम्यान पोलिसांनी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढल्यानंतर पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन जिल्हा हद्दपार केले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकांवर कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.