जळगाव ;- तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सातपुडा ऑटो मोबाईल येहून ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा मराजो कंपनीची कार अज्ञात चोरट्याने १ डिसेंबर रोजी सकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, स्वप्नील लुंकड यांच्या मालकीची महिंद्रा मराजो कार क्रमांक एमएच २-एफ इ -०३२८ क्रमांकाची कार नशिराबाद जवळ असणाऱ्या सातपुडा ऑटो मोबाईल येथे लावली असता १ डिसेंबर रोजी सकाळी साडेचार ते साडेपाच वाजे दरम्यान अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. याप्रकरणी विशाल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्य्क फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.