राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, बंगाल उपसागरात चक्रीवादळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतात पुन्हा नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याने रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे ३ डिसेंबर रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ येणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस पडणार आहे. चक्रीवादळमुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागात चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे.

तीन ते पाच डिसेंबरपर्यंत परिमाण
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र चक्रीवादळात बदलणार आहे. ३ डिसेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. IMD कडून तामिळनाडूतील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालचा उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ताशी ९ किमी वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जात आहे. आता पुढील १२ तासांत हे वादळ खोल दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकार सतर्क
चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेत आढावा घेतला. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी राज्यातील १२ जिल्हा प्रशासनसोबत बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबईत तापमान घसरणार असून हवेचा कडाका वाढणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.