सोन्याच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या नवे भाव

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War ) तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होतांना दिसत आहे. दरम्यान आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 3,000 रुपयांनी (gold rates) घसरण झाली आहे.

भारतातील 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,700 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 50,950 रुपये आहेत. गेल्या चार दिवसांपासून सोन्याचे दर घसरत आहेत. मुंबईत (Mumbai) 22 कॅरेट सोन्याचे दर 46,700 रुपये आणि 24 कॅरेटचे दर 50,950 रुपये आहेत. पुण्यामध्ये (Pune) 22 कॅरेट 46,820 आणि 24 कॅरेट 51,130 रुपये आहेत. नागपूरमध्ये (Nagpur) 22 कॅरेट 46,820 आणि 24 कॅरेट 51,000, नाशिकमध्ये (Nashik) 22 कॅरेट 46,820 आणि 24 कॅरेट 51,130 असे भाव आहेत.

युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम

रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. आजचे सोन्याचे दर पाहता 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी, मुंबईत (Mumbai) सोन्याचा भाव 46,700 रुपये, तर चेन्नईमध्ये (Chennai) सोन्याचा भाव 47,880 रुपये आहे. केरळमध्ये (Kerala) आज सोन्याचा दर 46,700 रुपये आहे. दिल्लीत (Delhi) 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,700 रुपये होता, तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर 47,880 रुपये आहे. केरळमध्ये सोन्याचा दर 46,700 रुपये आहे

जागतिक बाजारालाही फटका

युक्रेनवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन संकटाशी संबंधित नवीन घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली दिसत होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. सोन्याच्या दरात जोरदार वाढ झालेली पाहायला मिळत होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.