खडसेंनी तोंडाच्या वाफा सोडू नये, महाजनांचा जोरदार निशाणा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथराव खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात नेहमी शाब्दिक चकमक सुरूच असते. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

 निवडून येऊन दाखवावं

मंत्री महाजन म्हणाले की,  एकनाथ खडसेंनी उगाच तोंडाच्या वाफा सोडू नये मतदार संघात एकदा निवडून या. निवडणुकाजवळ आहेत. एकनाथ खडसेंनी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहावे; म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आहे आणि यश कोणाचा आहे. एकनाथ खडसे  यांनी लोकसभेला उभा राहील असे म्हटले आहे. पण लोकसभेला एकनाथ खडसेंनी उभे राहावं आणि निवडून येऊन दाखवावं. माझा लोकसभा उमेदवारीचा कुठलाही विचार नाही आहे. माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी केली आहे. मी आमदार आहे आमदार म्हणूनच राहणार. पक्ष जो आदेश देईल, तो पालन करेल.

तिकडे चोऱ्यामाऱ्या कर

तसेच पक्षाने सांगितलं आमदारकीत नाही राहायचं तर मी दुसऱ्या कामात राहील परिवाराच्या कामा ठिकाणी मी जाईल. मला सत्तेची हाव नाही. इकडे पडलो की इकडे तिकडे चोऱ्यामाऱ्या कर. असा उद्योग मी करत नाही. मी संघाचा सेवक आहे व पक्षाचा शिलेदार आहे बाकी त्यांना त्यांचं लक लाभ असेही महाजन म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.