जळगावात घरफोडी ; साडेचार लाखांचा ऐवज लांबविला !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून शहरातील विजय कॉलनी मधील अपार्टमेंटमध्ये चोरटयांनी साडेचार लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली असून दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विजय कॉलनी परिसरातील प्रसाद अपार्टमेंट येथील घर न.१० मधील रहिवासी गणेश नारायण व्यास(वय ४९ हे दि ६ रोजी घरी कुणीही नसताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान चोरून नेले. यामध्ये १ लाख ८० हजाराची रोकड तर २ लाख २५ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ३० हजार रुपये लंपास केले . या प्रकरणी गणेश नारायण व्यास यांनी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय शांताराम देशमुख हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.