सुरक्षेसाठी सलमान खानने घेतली बुलेटप्रूफ कार !

0

मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क

सलमानने थेट विदेशातून मागवलेल्या कारची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सलमानने सध्या काळजी घेतल्याचे समजते.

गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला धमकीची पत्रे येत होती, त्यानंतर भाईजानने आपल्या सुरक्षेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या दृष्टीनेच सलमानने विदेशातून बुलेटप्रूफ कार खरेदी केल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. . सलमानने आपली नवीन कार परदेशातून आयात केली आहे. निसान पेट्रोल एसयूव्ही असे या कारचे नाव आहे. विशेष म्हणजे ही कार सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही.ही कार दक्षिण आशियातील बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय आणि महागड्या एसयूव्हीपैकी एक मानली जाते. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ही कार खास असल्याचे समजते.

सलमान नुकताच त्याच्या चकाचक नवीन कारमध्ये एका कार्यक्रमात पोहोचला होता, जिथे त्याच्यासोबत त्याची सुरक्षा आणि मुंबई पोलीस अधिकारी देखील हजर होते. सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानशिवाय साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गिल आणि पलक तिवारी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.