Dogecoin च्या लोगो मुळे ‘इलॉन मस्क’ यांचे 1.30 लाख कोटींचे नुकसान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

इलॉन मस्क (Elon Musk) हे नेहमीच काहीतरी कारणाने चर्चेत राहत असता. इलॉन मस्क यांनी नेहमीच डोगेकॉइनचे(Dogecoin) समर्थन केले आहे. जेव्हा-जेव्हा त्यांनी डॉगेकॉइनच्या समर्थनार्थ ट्विट केले, तेव्हा या क्रिप्टोकरन्सीचे नशीब उजळते. यावेळी इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणीऐवजी Dogecoin चा कुत्रा वापरुन खळबळ उडवून दिली. त्यामुळे सर्वांनाच वाटले लोगो बदलण्याचे संकेत मस्क यांनी दिले असावे. पण आता परत त्यांनी लोगोमध्ये पक्षी आणला आहे. हा निर्णय चांगलाच महागाड पडलाय.

Dogecoin मुळे 1.30 लाख कोटी रुपये बुडाले

3 एप्रिल रोजी त्यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी इलॉन मस्क यांना 75 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. तेव्हापासून इलॉन मस्क यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. 3 एप्रिल ते 6 एप्रिलदरम्यान इलॉन मस्क यांनी $16 अब्ज गमावले आहेत. 3 एप्रिल रोजी मस्क यांना $ 9 अब्जांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर आतापर्यंत आणखी 7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात ही रक्कम 1.30 लाख कोटी होते. म्हणजेच, Dogecoin च्या कुत्र्यामुळे अवघ्या 4 दिवसांत मस्क यांना इतका फटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.