जळगावात घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबविला

0

जळगाव;- बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत फर्निचरच्या कपाटामधून सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील दर्शन कॉलनी परिसरात मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत मार्तंड देशमुख वय 45, रा. दर्शन कॉलनी जळगाव यांचे मेडिकल दुकान असून २८ डिसेंबर रोजी रात्री १ ते मंगळवारी २ जानेवारी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत, पुढील दरवाजाचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून फर्निचरच्या कपाटात ठेवलेले १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आला. घरमालक हेमंत देशमुख यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.