जळगावातील शिवाजी नगरात कंपनीला आग ; ४० ते ५० लाखांचे नुकसान

0

जळगाव ;- मनसाई बायोमेडिकल वेस्ट इंटरप्राईजेस या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ४५ ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची घटना छत्रपती शिवाजी नगर परिसरात घडली. अग्निशमनच्या बंबांनी आग आटोक्यात आणली . या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

मनोज माणिक नारखेडे (वय-५०) रा. आयएमआर कॉलेज जळगाव असून त्यांचे छत्रपती शिवाजीनगर परिसरात मनसाई बायोमेडिकल वेस्ट इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या ठिकाणी जळगाव रुग्णालयांमधून निघणारे मेडिकल वेस्ट मटेरियल साठवून ठेवण्याचे गोदाम आहे. दरम्यान रुग्णालयांमधून निघणारे मेडिकल वेस्ट एकत्रित करून गोदाममध्ये असताना सोमवारी २ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक गोदामाला आग लागली. 3 आग लागल्याची माहिती जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर तात्काळ तीन बंब घटनांसाठी दाखल झाले

दरम्यान एकापाठोपाठ एक बंब पाठवल्यानंतर एकत्रित तब्बल नऊ बंबाद्वारे पहाटे तीन वाजेच्या दरम्यान ही आग नियंत्रणात आणण्यात आली. याआगीत ऑनलाइन मशिनरी, कंप्यूटर, प्लास्टिक वेस्ट जळून खाक झाल्याने जवळपास ४५ ते ५० लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली . . घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी पाहणी केली. दरम्यान मालक मनोज नारखेडे यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव शहर पोलीस पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय झाल्टे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.