२२ जानेवारीला ‘ड्राय डे’ घोषित, मास-मटण विक्रीवर देखील बंदी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येमध्ये राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना होणार आहे. पाच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय २२ जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय यांनी एका व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. २२ जानेवारी रोजी राज्यामध्ये दारूविलरीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांसाची विक्रीही केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

“हे आपलं सौभाग्य की, छत्तीसगढ भगवान श्रीरामाच आजोळ आहे. अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्री रामाची प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने संपूर्ण छत्तीसगढमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी संपूर्ण राज्य एखादा उत्सव असल्याप्रमाणे जल्लोष साजरा करणार आहे. घरोघरी दिवाळी असल्याप्रमाणे दीप प्रज्वलन केलं जाईल. छत्तीसगढ सरकारने 22 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं साय यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.