राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून सुनावणी

0

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या विरोधातील कारवाईला वेग आला आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी कारवाईसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवार 4 जानेवारीपासून सुनावणी पार पडणार आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील फुटीनंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणी 31 जानेवारीपूर्वी निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर येत्या गुरुवारपासून सुनावणीच्या कामकाजाला सुरूवात करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.