लोकशाही न्यूज नेटवर्क
बँकेत खात असलेल्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची आहे. सोशल मीडियावर दररोज कोणते न कोणते मेसेज व्हायरल होत असतांना. त्यातील काही खरे असतात, तर काही भ्रम निर्माण करणारे, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुमचं बँक खातं आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर, तुमचं खातं बंद होऊ शकतं, असा दावा केला जात आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर त्यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा.
पॅन कार्ड लिंक नसल्यास बँक अकाउंट होईल बंद ?
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात लिहले आहे की, तुमच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल आणि तुमचं पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर, तुमचा बँक अकाउंट ब्लॉक करण्यात येईल, व्हायरल मेसेजमधील दाव्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी पीआयबीने फॅक्ट चेकमध्ये गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. या मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी त्यामागचं सत्य जाणून घ्या.
व्हायरल मेसेजचं सत्य
पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे. हा हॅकर्सचा गंडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने याबाबत अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये सांगण्यात आल आहे की, गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणारे नागरिकांना मेसेज पाठवत आहेत. जर ग्राहकांनी बँक खात्यात पॅन क्रमांक अपडेट केला नाही तर, तुमच खातं ब्लॉक केलं जाईल, असे मेसेज पाठवले जात आहे. यासोबत काही जणांना कॉल कोंब कोणत्याही लिंकद्वारे पॅन क्रमांक अपडेट केला नाही तर, तुमचा खात ब्लॉक केलं जाईल, असे मेसेज पाठवले जात आहे. तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला तर त्यावर चुकूनही विश्वास ठेऊ नका. हा मेसेज पूर्णपणे बनावटी आहे. असं सांगत इन्फॉर्मेशन ब्युरोने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.