Gold-Silver Price : सोन्या-चांदीचा आजचा भाव ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

0

मुंबई /जळगाव ;- नववर्षाच्या सुरुवातीला जळगावच्या सुवर्णगरीत सोने आणि चांदीच्या भावात थोडीफार घसरण झाली असून अजूनही सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसत आहे १ जानेवारीला सोने प्रति १० ग्राम ६३ हजार ३९० इतके होते. तर २ जानेवारीला ६३ हजार ३७० तर आज ३ जानेवारी मंगळवारी सोन्याच्या दरात दुपारी ३ वाजेच्या दरम्यान जळगावच्या सराफा बाजारात १० ग्राम सोने १९० रुपयांनी स्वस्त होऊन ६३ हजार १८० रुपये नोंदविला गेला . तर चांदी प्रतिकिलो १ जानेवारीला ७४ हजार ३५०,२ जानेवारीला ७४ हजार ७० रुपये तर आज चांदीच्या भावात तब्बल ६६० रुपयांची घसरण होऊन चांदीचा दर प्रतिकिलो ७३ हजार ४१० रुपये इतका नोंदविला गेला .

GoodReturns वेबसाइटनुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६३,४८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,५७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,१४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,५९० रुपये प्रतिकिलो होती.
इतर शहरातील सोन्याचे दर

मुंबई

२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५८,०८० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,३६० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,०८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,३६० रुपये असेल.

नागपूर

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,०८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,३६० रुपये इतका असेल.

नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५८,०८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,३६० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.