भयंकर: महिलेला विवस्त्र करुन रेल्वेतून फेकले, ८० फूट खोल पुलावरून..

0

उत्तरप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तरप्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर आलीय.  एका महिलेला विवस्त्र करून धावत्या रेल्वेमधून तब्बल ८० फूट खोल पुलावरून गंगा नदीत फेकल्याची भयंकर घटना घटना घडलीय. कानपूरमध्ये गंगा घाटाजवळ असलेल्या रेल्वेमार्गाखाली नाविकांना एक महिला जखमी अवस्थेत सापडली. ही महिला विवस्त्रावस्थेत होती. ती सातत्याने रडत होती. नाविकांनी त्वरित याबाबतची माहिती गंगा घाटावरील पंडा राजू यांना दिली. राजू यांनी या महिलेला त्वरित वस्त्र आणून दिली. तसेच तिची विचारपूस केली.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास धावत्या ट्रेनमधून काही लोकांनी तिला धक्का दिला. त्यामुळे ती पुलावरून थेट गंगा नदीच्या पात्रात पडली. सुदैवाने नदीमध्ये पाणी कमी होते. त्यामुळे ती कशीबशी किनाऱ्यावर पोहोचली. महिलेनं दिलेली माहिती ऐकून राजू यांनी पोलिसांना माहिती दिली. तिला प्रचंड दुखापत झाल्याने पोलिसांनी या महिलेला त्वरित रुग्णालयात पाठवले.

सदर महिलेच्या शरीरावर एकही वस्त्र नव्हते तसेच शरीरावर जखणांच्या खुणा होत्या. म्हणून तिच्यासोबत काही गैरप्रकार घडल्याच्या अंदाज येऊन पोलिसांनी तिची विचारपूस केली. मात्र ही महिला त्याबाबत काही स्पष्ट उत्तर देऊ शकली नाही. घडल्या प्रकारामुळे धक्का बसल्याने ही महिला काही बोलत नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.