चिमुकल्याच्या घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून मृत्यू

0

लखनऊ :;- पाच वर्षांच्या चिमुकल्याचा टॉफी घशात अडकल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून हमजा अंजुम बेगम असे चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी त्याने दुकानातून टॉफी घेतली. ते खाताच त्याच्या गळ्यात अडकले आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील रामपूरमधल्या शाहबाद नगर इथे ही घटना घडली. हमजाने जेव्हा चॉकलेट खाल्लं तेव्हा त्याला श्वास घेता येत नव्हता. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याच्या घशात अडकलेली टॉफी काढली. श्वासनलिकेत टॉफी अडकली होती. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.