६१ लाखांच्या गांजाप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

0

एरंडोल – एरंडोल तालुक्यातील खडकेसीम शिवारात नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी तब्बल 61 लाखांचा गांजा पकडल्याची कारवाई केली होती मात्र मुख्य संशयित पसार होण्यात यशस्वी झाला होता. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताच्या एरंडोल पोलिसांनी मध्यप्रदेशातील सेंधवा येथून मुसक्या आवळल्या आहेत. मेरसिंग खेरते खरगोन, मध्यप्रदेश असे अटकेतील संशयिताचे नाव असून संशयिताला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खडकेसिम शिवारात असलेल्या शेतात तुरीच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्यानंतर 4 नोव्हेंबर 2022 रोजी एरंडोल पोलिसांनी शेतात धाड टाकून 61 लाख 25 हजार रुपये किंमतीचा 875 किलो गांजा पकडला होता तर संशयित मेरसिंग खेरते हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला होता. संशयित मेरसिंग खेरते हा सेंधवा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी हवालदार अनिल पाटील, उमेश कुमावत हे सेंधवा येथे रवाना झाले. दोन दिवस पोलीस पथकाने सेंधवा येथे सापळा रचल्यानंतर मेरसिंग खेरते याला अटक करण्यात अली.

Leave A Reply

Your email address will not be published.