पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त वृक्षारोपण !

0

जळगाव ;- पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिवस- २०२३ साठी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “प्लास्टिक प्रदूषण व त्यावरील उपाययोजना ” ही होती.

जागतिक पर्यावरण दिन जागतील जवळपास १५० पेक्षा जास्त देशामध्ये साजरा करण्यात येतो.जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश्य आहे.

शाळेच्या परिपाठाच्या वेळी इ.१० वी तील विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कविता सदर केली.पोदार स्कुलच्या शिक्षकांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले होते.त्यात प्रमुख्याने वृक्षारोपण व संगोपन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे व प्रत्येकाने ती काटेकोरपणे पार पाडली पाहिजे असा आग्रह धरला.

शाळेचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी इ.९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांसह शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले.प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात एक रोप लावून त्याच्या संवर्धन व सुरक्षेची जबाबदारी किमान वर्षभर घ्यावी असे आवाहन पालकांना त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपप्राचार्य श्री दिपक भावसार मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ,प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे,वरिष्ठ समन्वयक श्री हिरालाल गोराणे ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.