राष्ट्रवादीतर्फे मुनगंटीवार, पाडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

0

जळगाव ;- राष्ट्रवादीचे नेते शरदर पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहर तर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ,भाजपा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध आज फोटोला जोडे मारून व्यक्त करण्यात आला ,

याप्रसंगी विविध घोषणादेण्यात आल्या . तसेच असे बेताल वक्तव्य करणे बंद न केल्यास सुधीर मुनगंटीवार व गोपीचंद पाडळकर यांना जळगाव जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला .

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रपाटील,प्रदेश ,सरचिटणिस नामदेव चौधरी,प्रदेश चिटणीस इजाजभाई मलिक,महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी,महिला महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील,वाल्मीक पाटील,प्रतिभाताई शिरसाठ,राजू मोरे,मजहर पठाण ,डॉ.रिझवान खाटीक,रमेश पाटील,ॲन्ड सचिन पाटील , सौ वर्षाताई राजपुत , सौ सुमनताई बनसोडे,सौ कलाबाई शिरसाठ, अमोल कोल्हे,दत्तात्रय सोनवणे,सुशील शिंदे,रहीम तडवी,संजय चव्हाण,अशोक सोनवणे,साहील पटेल,आकाश हिवाळे,सचिन साळुंखे,विनोद धमाले,सुहास चौधरी,हितेश जावळे,पंकज तनपुरे,चंद्रमणी सोनावणे ,भाला तडवी, गणेश निकम आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.