लहान असो वा मोठा वाघ “वाघचं” असतो; आकाश ठोसर दिसणार ऐतिहासिक भूमिकेत!

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘रवी जाधव’ (Ravi Jadhav) यांच्या ‘बाल शिवाजी’ (Baal Shivaji) या चित्रपटाची घोषणा काही दिवसापूर्वीच करण्यात आली होती. तेव्हा पासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेकाच्या मुहूर्तावर बाल शिवाजी चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ आउट करण्यात आला आहे. या सिनेमात ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसरची (Akash Thosar) वर्णी लागली आहे. अर्थात छत्रपतींच्या भूमिकेत सर्व रसिक प्रेक्षकांना आकाश दिसणार आहे. हा चित्रपट बिग बजेट असून यावर प्रत्येक जणांनी मेहनत केली आहे.

तसे पहिले तर शिवरायांच्या बालपणीच्या गोष्टी कोणालाही जास्त माहित नसून त्याच दाखविण्याचा प्रयत्न रवी जाधव यांनी केला आहे. या चित्रपटात वयवर्षे १२ ते १६ पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या रंजक गोष्टी यात पाहायला मिळतील. या सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहले, “लहान असो वा मोठा वाघ “वाघाचं” असतो.

काय म्हणाले रवी जाधव

“माझा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता, शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांच्या भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्य कशी तीक्ष्ण झाली हे दाखवले. मी गेली नऊ वर्ष या स्क्रिप्टवर काम करत आहे. दिगदर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट करत आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.